अबूल हसन खान 

दक्षिण मध्य लोकसभा उमेदवार 

वंचित बहुजन आघाडीचे दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातील लोकप्रिय उमेदवार अबूल हसन खान यांना जनतेचा प्रचंड पाठिंबा मिळत असून प्रस्थापित पक्ष आणि त्यांचे उमेदवार यांना लोकानी नाकारले आहे.  देशातून भाजप आणि मोदी ची सत्ता घालवून संविधानचे राज्य प्रस्थपित करण्यासाठी अबूल हसन खान यांना मोठ्या प्रमाणात जनतेचे पाठबळ मिळत आहे. 

Vision, Issues, & Values

प्रिय मतदार बंधू आणि भगिनींनो,
सस्नेह नमस्कार, जय भीम, अस्सलाम वालेकुम…
मी अबुल हसन खान.सामान्य कुटुंबात जन्म घेऊन, आपली जिद्द, परिश्रमाने आज समाजात एक ओळख निर्माण केली आहे,मी अनेक सामाजिक गरीब गरजू विद्यार्थ्यांना मदत करणे, तसेच त्यांच्यावर घडलेल्या अन्यायाविरुद्ध नेहमी लढा देणे इत्यादी कामे अग्रक्रमाने केली. या दरम्यानच्या काळात प्रतिकूल परिस्थितीवर मात करत अथक परिश्रमातून एक यशस्वी व्यावसायिक म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. एक सामाजिक जबाबदारी लक्षात ठेऊन आद. बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली, मी वंचित बहुजन आघाडीचे मुंबई अध्यक्षपद ही महत्वाची जबाबदारी गेल्या काही वर्षांपासून यशस्वीरित्या पार पाडत असून एक साधारण कार्यकर्ता म्हणून काम करत आहे. हाती घेतलेले काम निष्ठेने व जिद्दीने पूर्णत्वास नेण्याच्या माझ्यातील गुणांना पारखून आद. बाळासाहेब आंबेडकरांनी मला वंचित बहुजन आघाडीची 30-दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघाची उमेदवारी दिली आहे.

 सद्यस्थितीतील विषमतावादी भाजप आणि मित्र पक्षांच्या फेकू सरकारने, देशात राजकीय, शैक्षणिक, रोजगार, बेरोजगार, सामाजिक, आर्थिक, औद्योगिक, अपुऱ्या पायाभूत सुविधा, इत्यादी समस्यांचा जणू डोंगरच उभा केला आहे. तसेच या सरकारच्या जातीयवादी धोरणांपायी , संविधानाला व जाती धर्माच्या नावावर देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे.
वरील सर्व समस्या व धोक्यांपासून आपला दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदार संघही सुटला नाही किंवा या धोक्यांना अपवाद राहिला नाही. या करिता, देशातील इतर समस्यां सोडविण्याचा प्रयत्न करत असतानाच, मी स्थानिक समस्यांवर काम करणार आहे. माझी निशाणी गॅस सिलेंडर असून येत्या 20 मे रोजी आपण आपले बहुमूल्य मत मला देऊन आपल्या मंतदारसंघाचा विकास करण्यासाठी संसदेत पाठवाल हा विश्वास आहे.

Get In Touch